Monday 13 November 2017

कांडी कोळसा तयार करणे

कांडी कोळसा म्हणजे काय?
कांडी कोळसा म्हणजे झाडांचा किव्हा शेतांतून निघालेला पालापाचोळा ज्याला biomass असेही म्हणतात, त्या पासून कोळसा तयार करणे. हा biomass मोफत उपलब्द असल्यामुळे त्याचा कोळसा तयार करून आपण मोफत इंधन तयार करू शकतो.

प्रक्रिया
कांडी कोळसा तयार करण्यासाठी biomass ला कमी ऑक्सिजन देऊन त्याला अर्धवट जाळून त्यापासून कोळसा तयार होतो. 

त्यासाठी आम्ही सर्वात आधी biomass जाळण्यासाठी एक पत्र्याचा ड्रम घेतला व त्याला खालून व आजूबाजूने ड्रिल मशीनने साधारण २५ होल पाडून घेतले. म्हणजे ह्या होल मधून बाहेरची हवा ड्रम मध्ये शिरेल. ड्रम ला वरतून बंद करण्यासाठी झाकण असायला हवे.

मग आम्ही झाडाचा साधारण ८ किलो पालापाचोळा गोळा केला व ड्रम मध्ये टाकला. मोठ्या काड्या टाकल्या नाहीत कारण Biomass एकसारखे असणे गरजेचे आहे नाहीतर काही भाग पूर्ण जळतो तर काही भाग फारच कमी जळतो. सगळा biomass एकसारखा जाळायला हवा.

मग ड्रम मधला पालापाचोळा आम्ही पेटवून दिला व वरचे झाकण बंद केले. धूर बाहेर जाण्यासाठी झाकणाला वरून होल ठेवले होते. त्याचा कोळसा बनायला साधारण ३ ते ४ तास पेटत ठेवायला लागतो. ड्रम मध्ये Biomass पेटत असताना ड्रम ला पाडलेल्या होल मधून त्याला कमी ऑक्सिजन मिळते त्यामुळे तो पूर्ण पेटत नाही व त्याची राख होत नाही. जास्त वेळ पेटत ठेवल्यास त्याची पूर्ण राख होण्याची शक्यता असते.

कोळसा तयार झाल्यावर त्याला पाणी टाकून विजवले व सगळा कोळसा बाहेर काढून घेतला. तो ओला झालेला कोळसा उन्हात सुकवण्यासाठी ठेवला. कोळसा सुकल्यानंतर सगळा कोळसा एका पोत्यात भरला व त्याला ठोकून बारीक चुरा तयार केला. त्यातून कोळसाची powder तयार झाली. त्या powder चे वजन करून त्याला एका बादलीत काढून घेतले.

त्या कोळसाला एकत्र बांधता येण्यासाठी दुसर्या बाजूला कणिक घेतले व त्यात पाणी टाकून पातळ पेस्ट तयार केली. १ किलो कोळसाच्या powder मागे साधारण १०० ग्राम कणिक लागते. हि पेस्ट त्या powder मध्ये टाकली व एकत्र केली. त्यातून कोळसाची काळी पेस्ट तयार झाली. ह्या पेस्ट चे लहान गोळे तयार करून उन्हात सुकवायला ठेवले व सुकल्यानंतर काडी कोळसा तयार झाला.


Monday 30 October 2017

कामातून शिक्षण: विज्ञान आश्रमाचा अभ्यास



विज्ञान आश्रमात मी ह्या अगोदर ४ दिवस राहून गेलो होतो त्यामुळे ह्यावेळेला राहायला येताना असे वाटले कि मी आश्रमाच्या कामाशी व DBRT च्या मुलांच्या उपक्रमाशी चांगला अवगत असेल व मला सगळे लवकर लवकर कळायला लागेल. पण तरीही पहिला आठवडा मध्ये मला सगळ्याशी अर्थ लावून घ्यायला वेळ लागला. परत दिवाळी आत्ताच संपल्या मुळे आणि Sections मध्ये मुले स्वतः नवीन असल्या मुळे ते हि थंडच वाटत होते. त्यात IBT च्या शिक्षकांचा प्रशिक्षण असल्यामुळे Section च्या सरांचे हि लक्ष मुलांकडे कमी होते. त्यामुळे section मध्ये नेमके काय चालले आहे बरोबर कळत नव्हते. 

मागच्या वेळेला आलो तेव्हा मनात फारसे नियोजन नव्हते व नेमका कोणता अभ्यास करायचा, इथे येऊन काय शोधायचे हे अजून बारकाईने निश्चित नव्हते. फक्त एक आराखडा होता कि “मुले कामातून कसे व काय शिकतात” हे बघणे. हा माझ्या Ph.D च्या अभ्यासाचा मुख्य विषय. या वेळेस मात्र काय शोधयाचे या बद्दल काही बाबी अधिक स्पष्ट होत्या. कारण मी नुकताच वर्धेच्या आनंद निकेतन, या नई तालीम शाळेचा एक महिना अभ्यास करून आलो होतो. त्यातही मुले एखाद्या व्यावासायातून शिकतात. त्या अनुभवातून बरेच प्रश्न निर्माण झाले व ते घेऊन मी विज्ञान आश्रमात आलो आहे. जसे 

१.      मुले विविध कामातून नेमके काय शिकतान, त्यांना कामातून मिळणारे (व्यावसायिक) ज्ञान व शाळेत शिकवले जाणारे पुस्तकी ज्ञान, यात नेमके काय फरक आहे व काय साम्य आहे?  
२.      कामातून मुले कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे शिकतात?
   ३.      कुठल्या प्रकारच्या गोष्टी (माहिती) ते कामातून स्वतः शिकू शकतात व कुठली गोष्ट ते कोणी सांगितल्या शिवाय किव्हा त्याबद्दल वाचल्या शिवाय शिकू शकत नाही?
   ४.      कुठल्या प्रकारची माहिती एखादे काम पूर्ण करण्यासाठी उपयोगी असते? व कुठली माहिती फारशी गरजेची नसते?
   ५.      ‘ज्ञान’ आणि ‘काम’ याचा समन्वय कसा साधला जातो? दोघात नेमका काय संबंध आहे?
   ६.      मुले कामाकडे कुठल्या दृष्टीने बघतात? DBRT मध्ये ते कोणत्या उद्दिष्टाने आलेले आहेत? त्याच्या क्षमता आणि पार्श्वभूमीचा त्यांच्या (कामातून) शिकण्यावर काय परिणाम होतो?
   ७.      शिक्षक मुलांना कामातून कसे शिकवतात?

या सारखे इतर अनेक प्रश्न घेऊन मी आश्रमात DBRT च्या मुलांचा अभ्यास करीत आहे. अभ्यासाची पार्श्वभूमी म्हणजे सद्याची शिक्षण प्रणाली जी ज्ञान व पाठ्यपुस्तक केंद्रित आहे. मुले प्रत्यक्ष अनुभवातून अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतात हे सर्वमान्य असून सुद्धा आपण तशा प्रकारची शिक्षण व्यवस्था उभारू शकलो नाही. स्वातंत्र्योत्तर काळातील नई तालीम चा प्रयोग आपण यशस्वी पणे पुढे नेऊ शकलो नाही. त्यामागे राजनैतिक कारणे असली तरी शैक्षणिक दृष्ट्याही ते अजून अप्रगत होते. अशा प्रकारची शिक्षणव्यवस्था उभारायची असेल तर अधिक सखोल अभ्यासाची गरज आहे असे मला वाटते.

अभ्यासासाठी DBRT चा प्रत्येक section मध्ये साधारण ३ ते ४ आठवडे राहण्याचा माझा विचार आहे. ह्यात मुख्यतः मुलांच्या कामांचे निरक्षण आणि संबंधित चर्चा असतील.

आश्रमात माझा पहिला आठवडा
मी आश्रमात २५ ऑक्टोबर ला दुपारी पोहोचलो. सुरवातीला मी ‘ऊर्जा व पर्यावरण’ या विभागात काम सुरु करायचे ठरवले. या विभागाला सगळे ‘Electrical Section’ असे म्हणतात हे माझ्या मागेच लक्षात आले होते. असे प्रत्येक विभागाचेच एक टोपण नाव आहे जे रोज अनौपचारिक रित्या वारपले जाते. विभागात गेल्यावर काही कामं मुलांना सरांनी देऊन ठेवली होती. मी सिद्धेशचे (नाव बदलले) काम पाहायला लागलो. तो पाण्याच्या मोटरची winding चे काम करत होता. लाकडावर चार खिळे ठोकून त्याभोवती तांब्याची तार गुंडाळत होता व साधारण १४० गुंडाळ्या झाल्यावर ते तो मोटर मध्ये बसवत होता. त्याला पाहून व त्याच्याशी बोलून कळले कि त्याला मोटरशी संबंधित बरीच माहिती आहे. 
पण Section आत्ताच बदलले असल्या मुळे तो हे सर्व कधी शिकला असा प्रश्न मला पडला. त्याने सांगितले कि तो या Section चा आधीचा विद्यार्थी आहे व तो आधीच हे काम शिकला आहे. आता तो ‘Food section’ मध्ये आहे म्हणजेच ‘गृह व आरोग्य’!

पुढील काही दिवस त्याला सतत याच Section मध्ये पाहून त्याला इलेक्ट्रिक मशिनीवर काम करण्यात आवड आहे असे लक्षात आले. व विचारल्यावर त्याने कबूलही केले. इलेक्ट्रिक मध्येच अजून पुढे शिक्षण घेण्याची इच्छा हि त्याने व्यक्त केली. अजून विचारपूस केल्यावर लक्षात आले कि त्याला इथेच आल्यावर समजले कि त्याला ह्यात आवड आहे. ऐकून छान वाटले. तेच शिक्षण पुस्तकातून दिले असते तर त्याला त्यात आवड आहे कि नाही हेही कदाचित कळले नसते.

पुढील दोन चार दिवस तो ह्या मोटरवर तेवढ्याच उत्साहाने काम करत होता व त्याने ती यशस्वीरित्या पूर्ण तयारही केली. नंतर मी एकदा त्याला मोटर चे काम करण्यामागील वैज्ञानिक तत्व विचारले. तो म्हणाला कि कोइल मधून current गेला कि कोइल magnet बनते व ती आतल्या रोटर ला फिरवते. तो रोटर तांबा व इतर एका धातूचा आहे असे त्याने सांगितले. पण तांब्याची कोइल रोटर ला नेमकी का फिरवते याचे उत्तर त्याकडे आहे असे वाटले नाही. त्याला तसा प्रश्न पडला कि नाही हे मी त्याला तेव्हा विचारले नाही.

पण यावरून असे लक्षात आले कि एखाद्या माशिनीवर काम करताना काही व्यावहारिक माहिती असणे पुरेशी असते. त्यात कोणते पार्टस आहेत व ते कसे जोडले जातात हे माहिती असेल तरी काम पूर्ण होते. त्यामागील वैज्ञानिक तत्वे माहिती असण्यास गरज नाही.

एकदा तो इलेक्ट्रिक वजन यंत्रावर काम करत होता. त्यासाठीही ते नवीनच होते. माशिनीचे निरक्षण केल्यावर कळले कि त्याच्या बटरी च्या बटण मध्ये बिघाड आहे. त्यामुळे सर्किट तुटत होते. ते हि त्याने पूर्ण उत्साहाने बसवले. आतल्या कोणत्या तारा कुठे जोडायच्या हे त्याने स्वतः तपासून, शोधून, बसवले. मशीन सुरुहि झाले. पण मशीन बंद करताना अचानक लक्षात आले कि इंडिकेटर चा आकडा शून्यच दाखवत आहे. कितीही वजन दिले तर त्यात काहीच बदल होत नाही. बराच शोधूनही त्याचे कारण त्याला काही सापडत नव्हते. व ती सर्किटची पण समस्या नव्हती, नाहीतर मशीन चाललेच नसते. शेवटी ते काम बंद करावे लागले.

या कामात नक्कीच अजून थोड्या माहितीची गरज होती. कदाचित मशीन नेमके वजन कसे मोजते यामागील तत्वाचा उपयोग झाला असता. म्हणजे समस्या नेमकी कुठे आहे हे कळायला मदत झाली असती. पण त्यातील तत्व समजायला नक्कीच त्यावयासाठी कठीण गले असते. त्यापेक्षा कोणते पार्टस कसे जोडायचे व अमुक एखादी समस्या असेल तर ती कोणत्या पार्टची बिघाड आहे हे पाहून व तो पार्ट नवीन बसवून समस्या सहज सोडवता येऊ शकते. विज्ञान वगैरेची काही गरज नाही. हेच का Vocational Education? कदाचित नाही व आता तसे मला सांगताही येणार नाही. ह्यात शिक्षकाची नेमकी काय भूमिका आहे? पुढील निरीक्षण करताना हे प्रश्न मला मनात उघडे ठेवायचे आहे.
या दिवसात अजून काही उपक्रम बघायला मिळाले. वर्कशॉप च्या बाहेर ची वायरिंग दुरुस्त करणे, स्पीकर दुरुस्ती, टोर्च दुरुस्ती, IBT च्या शिक्षकांचा काडी कोळशाचा व water level indicator प्रयोग, इ. मुलांनी आश्रमाचे एक ‘Safety Audit’ हि केले. प्रत्येक उपक्रमातून अधिकाधिक समज विकसित होत आहे.

ह्या उपक्रमाबरोबर सरांनी मुलांना एकत्र बसवून बरीच माहित सविस्तर दिली. Daily Dairy कशी लिहावी ते सांगितले. एखादे काम करताना स्वतः ची सुरक्षा कशी करायची याबद्दल सांगितले व त्या द्वारे या व्यवसायातील अनेक निगडीत चर्चा केल्या. Safety Audit मधून निघालेले कामाची सूची तयार केली व ती कामे पुढील आठवड्यापासून सुरु होतील. मुले नवीन असल्या मुळे सध्या सर्किट च्या संबंधित समस्या घ्यायचा ठरवल्या. त्यातून सर्किट कसे असते ते मुलांना लक्षात येईल. सरांच्या मते पुस्तकावर समजवण्यापेक्षा मुले यातून अधिक चांगले शिकतील. सर्किटचे  कळल्यावर पुढील कठीण कामं हाती घेता येतील व नवीन संकल्पना कळतील. शिक्ष्ण्याची हि प्रक्रिया मी समजून घेत आहे.

कांडी कोळसा तयार करणे

कांडी कोळसा म्हणजे काय? कांडी कोळसा म्हणजे झाडांचा किव्हा शेतांतून निघालेला पालापाचोळा ज्याला biomass असेही म्हणतात, त्या पासून को...